शिक्षक हक्क विकास समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोहम्मद अखिल शेख सर यांची निवड

शिक्षक हक्क विकास समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोहम्मद अखिल शेख सर यांची निवड
बीड/प्रतिनिधी
येथील मिलियम मुलांची प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहम्मद अखिल शेख सर यांची शिक्षक हक्क विकास समितीच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
असे की येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांच्या आदेशाप्रमाणे संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाअंतर्गत चालणाऱ्या शिक्षक हक्क विकास समितीच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी शहरातील मिल्लिया मुलांची प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहम्मद अखिल शेख सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी दशरथ रोडे (राज्य कार्याध्यक्ष), भागवत वैद्य (प्रदेश संघटक), पठाण अमर जान (मराठवाडा संघटक),राजकुमार दिवार रामनाथ कांबळे (बीड जिल्हाध्यक्ष),पृथ्वीराज निर्मळ (कोषाध्यक्ष ),ब्रह्मनाथ कांबळे (बीड जिल्हा उपाध्यक्ष), इरफान शेख (बीड जिल्हा उपाध्यक्ष) ,संतराम जोगदंड (बीड जिल्हा संघटक),श्रीमती मनीषा ताई घुले,(प्रदेशाध्यक्ष महिला उद्योग विकास समिती) व शेख तालीब ( पोलीस मित्र विकास समिती जिल्हाध्यक्ष ) आदींनी मोहम्मद अखिल शेख सरांना शुभेच्छा देत पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा आहेत.








