व्हेंचर कॅपिटल फंड अंतर्गत लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे

व्हेंचर कॅपिटल फंड अंतर्गत लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे
धोरण : मंत्री रामदास आठवले यांचे बैठकीत आवाहन
दिल्ली येथील बैठकीत पप्पू कागदे यांची उपस्थिती
बीड / प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए.) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शास्त्री भवन येथे व्हेंचर कॅपिटल फंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सभेत समाजातील वंचित व मागासवर्गीय उद्योजकांच्या समस्या जलदगतीने निकाली काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. बैठकीत आठवले यांनी उद्योगांसाठीचे कर्ज लवकरात लवकर सोडणे आणि पेमेंट संबंधित समस्यांचे जलद निराकरण करण्याला अधिक महत्त्व दिले. या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गासह महाराष्ट्रातून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांची उपस्थिती होती.
दरम्यान शास्त्री भवन नवी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील रखडलेल्या त्यांच्या विभागाच्या प्रस्तावाविषयी आयएफसीआयच्या व्हेंचुर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनेचा व प्रस्तावाचा आढावा घेतला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देशातील सर्व उद्योजकांना आवाहन करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व उद्योजकांनी पुढे यावे,असे आवाहन केले आहे. यावेळी झालेल्या बैठकीत पप्पू कागदे युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यांनीही विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीला आयएफसीआयचे शिवेंद्र तोमर (एमडी),पूनम गर्ग ( जीएम) ,अरिद्धम रॉय ( एजीएम) तसेच बी. एन. सिंग वरिष्ठ स्वीय सहाय्यक), राहुल लिमये (स्वीय सहाय्यक) यांची उपस्थिती होती.








