जिल्हा शल्यचिकित्सक साहेब माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तपेडी ची सुविधा असती तर योगिता कुलथे यांचा प्राण वाचला असता-सोहेल भाऊ अत्तार

जिल्हा शल्यचिकित्सक साहेब माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तपेडी ची सुविधा असती तर योगिता कुलथे यांचा प्राण वाचला असता-सोहेल भाऊ अत्तार
माजलगाव/वार्ताहार
बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे साहेब आम्ही दिनाकं 19 जानेवारी 2022 रोजी आपणास ए.आय.एम.आय.एम पक्षा तर्फे जिल्हाध्यक्ष अँड.शेख शफीक भाऊ साहेब यांच्यां मार्गदर्शनाखाली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तपेडी ची सुविधा करणे बाबत निवेदन दिले होते, तरी आपण व आपल्या व्यवस्थेने यांची दखल घेतली नाही,माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तपेडी सुविधा नसल्यामुळे काल रविवारी योगिता अशोक कुलथे यांचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला असे माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ,सुमित मसुरे यांनी दिनाकं 16 जानेवारी 2022 च्या लोकमत च्या प्रसिद्ध पत्राद्वारे सांगितले त्या करीता माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी ची खूप गरज आहे त्यामुळे लवकरात लवकर रक्तपेडी ची सुविधा करावी








