अमृत अटल योजनेच्या कामात होत असलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे-शेख नदीम गणी

अमृत अटल योजनेच्या कामात होत असलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे-शेख नदीम गणी
बीड/वार्ताहर
अमृत अटल योजना महाराष्ट्रातील 43 शहरांमध्ये राबवली जात आहे. बीड नगर परिषदेमध्ये 2015 ते 2020 या पाच वर्षांमध्ये योजना पूर्ण होणे गरजेचे होते.जेव्हा या योजनेचे कंत्राट महाराष्ट्र प्राधिकरण यांच्याकडे दिले.त्या वेळेस या कामासाठी जी जागा उपलब्ध करून द्यायची होती ती जागा नगरपरिषदेने दुसर्याच एका व्यक्तिच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली .काम चालू झाले असता त्या व्यक्तीने त्यावर आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व कोर्टात धाव घेतली तेव्हा त्यानंतर नगरपरिषदेने लवकरात लवकर प्राधिकरणाला दुसरी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे होते.परंतु ती तत्परता नगरपालिकेने व नगराध्यक्षाने दाखवली नाही म्हणून हे काम रखडले गेले यामध्ये यांचा बराचसा कालावधी वाया गेला आणि आता नगर परिषदेचे अध्यक्ष व नगरसेवकांची "नाचता येईना,अंगण वाकडे" अशी त्यांची अवस्था झाली आहे व आपल्या कार्यक्षमतेचा खापर कंत्राटदाराच्या माथी फोडत आहेत.बीडची जनता क्षीरसागरांच्या नाटकाचा हा अंक चांगलाचं ओळखून आहे. आता नागरिकांच्या गैरसोयीबाबत नगराध्यक्ष व नगरपरिषद जबाबदार आहे ही जबाबदारी त्यांनी स्वतः घेऊन बाजूला जावे . असे पत्रक शिवसंग्राम अल्पसंख्यांकांचे नेते शेख नदीम गणी यांनी काढले आहे.
बालेपीर येथील प्रभागातील नागरिकांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी व मतदाना पुरते आश्वासने द्यायचे व मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा काम आतापर्यंत झालेले आहे. गुलशनपुरा रोशनपुरा अजमेर नगर भागात रस्ते नाही,गटारी नाही पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन अतिशय जुनी झाल्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी येत आहे . पाईप लाईन अतिशय जुनी झाल्यामुळे खूप जागेवर लिकेज आहे लिकेज व पाईपलाईन असल्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अमृत अटल पेयजल योजना अंतर्गत या भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झालेली आहे. शहराच्या प्रमुख मार्गावरील भाग असून ग्रामीण पेक्षाही वाईट परिस्थिती आहे सर्व राजकीय नेत्यांनी या भागाच्या नागरिकांना स्वतःच्या स्वार्थपरता वापर करून पाच वर्ष वाऱ्यावर सोडलं शासनाची कोणतीही योजना आज पर्यंत शंभर टक्के पूर्ण झालेली नाही.
अमृत अटल पेयजल योजना अंतर्गत सध्या होत असलेल्या कामामध्ये कमालीची अनियमितता आहे. पाईप जोडणी झाल्यानंतर बरेच कालावधीपर्यंत खड्डे तसेच ठेवण्यात येत आहे. नगरपालिका व जीवन प्राधिकरण प्रशासनाचे या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष असून खड्डे बुजवताना कुठल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही. या साइटवर कुठलाही अधिकृत कर्मचारी, सुपरवायझर अथवा इंजिनियर हजर नसतात तसेच रस्ता क्रॉस करून पाईप जोडणी करतांना लोखंडी पाईप चा वापर करण्यात येत नाही. सिमेंट रस्ता फोडून कनेक्शन दिल्यानंतर सिमेंट माल टाकला जात नाही. अशा अनेक बाबी निदर्शनास येत आहेत.त्यामुळे अमृत अटल योजनेच्या कामात होत असलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.अन्यथा शिवसंग्राम स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसंग्राम अल्पसंख्यांक नेते शेख नदीम गणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.








