मौलाना आज़ाद महामंडळाच्या बजेटमध्ये वाढ;लोकसेना संघटनेच्या मागणीला यश

Beed

मौलाना आज़ाद महामंडळाच्या बजेटमध्ये वाढ लोकसेना संघटनेच्या मागणीला यश

बीड/प्रतिनिधी

शासनाने नुकतेच मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमाने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कर्जासाठी बजेट वाढ केलेली आहे यामागणीसाठी अनेक दिवसापासून लोकसेना संघटना संघर्ष करत होते शासनाने बजेट वाढ केल्याने लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी शासनाचे आभार मानले, कारण दोन ऑक्टोबरला सत्याग्रह आंदोलन करुन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय उपाेषणाला बसलो होतो यामध्ये शहरातील विविध पक्ष-संघटनेचे नेते आंदोलनामध्ये सामिल होते शासनाने अल्पसंख्याक समाजाकड़े, विशेष करुन मुस्लिम समाजाकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे अठरा डिसेम्बरला अल्पसंख्याक हक़दिनी शासनाचा निषेध करुन जिल्हाधिकारी यांच्या बैठकीवर बहिष्कार घालून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक मंत्री यांना मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाच्या बजेट मध्ये वाढ करण्यासह मुस्लिम आरक्षण व इतर मागण्यासाठी लोकसेना संघटनेने शासनाला आंदोलन व निवेदनाद्वारे मागणी केली होती शासनाने बजेट वाढ करुन अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला फूल नाही फूलाची पाकड़ी दिल्याबद्द्ल लोकसेना संघटना व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात आले व हे आंदोलन इथेच थांबणार नाही जो पर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत असा इशारा ही शासनाला लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसार माध्यमाच्या वतीने दिलेला आहे.

                                 

Sharing

Visitor Counter