रिदा फातेमा चा पहिला रोजा पूर्ण
Beed

रिदा फातेमा चा पहिला रोजा पूर्ण
बीड/प्रतिनिधी
इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात 'रोजा'ला विशेष महत्त्व आहे.या महिन्यात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच पहाटे सहेरी करून रोजा (उपवास) ठेवतात.बीड शहरातील स्वराज्य नगर येथील सहा वर्षीय रिदा फातेमा यासेर मिर्जा या लहान मुलीने आपल्या जीवनातील पहिला रोजा बुधवार दि.२1 मे रोजी पूर्ण केला.पहाटे चार वाजता उठून आपल्या कुटुंबियांसोबत रिदा फातेमा याने सहेरी केली होती.मे महिन्याचे कडक ऊन अशात दिवसभर अन्न पाण्या शिवाय हा रोजा त्याने ठेवला.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसोबत त्याने रोजा इफ्तारी केली.कमी वयात रिदा फातेमा याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.








