लाभार्थी कामगारांना महामंडळातर्फे नवीन नोंदणी, नुतनीकरण, व स्मार्ट कार्ड त्वरित वाटप करा. महाराष्ट्र राज्य बांदकाम कामगार सेना संघटना ची मागनी

लाभार्थी कामगारांना महामंडळातर्फे नवीन नोंदणी, नुतनीकरण, व स्मार्ट कार्ड त्वरित वाटप करा. महाराष्ट्र राज्य बांदकाम कामगार सेना संघटना ची मागनी
बीड/वार्ताहर
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बीड जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत कामगार असून महाराष्ट्र शासनाने नोदणीकृत कामगारांना अनेक योजना लागू केलेल्या आहेत. बीड जिल्ह्यात या योजनांचा लाभ मिळालेला आहे. तसेच कोरोना संसर्ग होऊ नये म्हणुन मडंळाने सर्व कामकाज आनॅलाईन पध्दतीने सुरु केले आहे. पण नवीन नोंदणी व नुतीनकरण फॉर्म ऑनलाईन केल्यावर तीन ते चार महिने होऊनही लाभार्थी व बांधकाम कामगाराना मंडळाची नोंदणी व नुतनीकरण झालेले नाही. त्यात वारंवार त्रुटी काढली जाते. कामगारांना त्यांचे काम सोडून नगरपंचायतच्या / ग्रामपंचायत कार्यालयाला चकरा माराव्या लागतात. त्यामुळे संबंधित अधिकारी सुद्धा सही व शिक्के देण्यास टाळाटाळ करतात. संबंधित अडचणीमुळे कामगारांना नुतनीकरण केल्याशिवाय कुठल्याच योजनांचा लाभ ही घेता येत नाही. तरी आरोग्य योजना, शैक्षणिक योजना, सामाजिक योजना, आर्थिक सहाय्य योजना या योजनांचा लाभ मिळण्यापासून कामगार वंचित राहतात. कामगारांनी ऑफलाईन पद्धतीने भरलेले विविध योजनाचे फॉर्म भरुनही अद्यापपर्यंत त्यांना कसलाही लाभ मिळालेला नाही. तरी तात्काळ मा.साहेबांनी कामगारांना मिळालेले लाभ कामगारांच्या बँक खात्यात जमा करावेत. नुतीकरण पावती व नवीन नोंदणीची पावती, कामगारांचे स्मार्ट कार्ड देण्यात यावे व कामगारांची होणारी पिळवणूक थांबवावी नसता महाराष्ट्र राज्य बांधकाम सेना संघटना संस्थापक अध्यक्ष प्रमिलाताई माळी यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना बीड जिल्हाध्यक्ष सय्यद फरहान व पाटोदा तालुका अध्यक्ष सय्यद सलिम यांच्या नेतृवाखाली सर्व नोंदणीकृत लाभार्थी व कामगार यांच्या समवेत आपल्या कार्यालयासमोर आंदोलनास बसण्यास येईल असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी व इतर कामगारांकडून केले जात आहे.त्या वेडी बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद फरहान पाटोदा तालुका अध्यक्ष सलीम राज .पठाण आरीफ राज .जाहेद खान .अतीश ईंगळे .सखलेन खान उपस्थित होते।








