चिमुकल्यांने केली भगवान शंकराची वेशभुषा; अनेक भाविकांची मने जिंकली!

Beed

चिमुकल्यांने केली भगवान शंकराची वेशभुषा; अनेक भाविकांची मने जिंकली!

परळी वैजनाथ/प्रतिनिधी

महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त येथील अमित मोटेगावकर यांचा मुलगा शिव याने भगवान शंकराची वेशभुषा साकारल्याने अनेकांची मने जिंकली.

येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त येथील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी अमित मोटेगावकर यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलाला भगवान शंकराच्या वेषभुशेत नेल्याने अनेक भाविकांची या चिमुकल्याने मने जिंकली. शिव या मुलाच्या हातात त्रिशूळ, डमरु, गळ्यात रूद्राक्ष माळ, जटा बांधल्याने अनेकांनी या चिमुकल्याचे कौतुक केले. आई-वडीलांचे अभिनंदन केले. अनेक भाविकांनी या मुलासोबत सेल्फी काढल्या व मुलाचे भरभरुन कौतुक केले.

 

 

 

Sharing

Visitor Counter