वन्यजीवांचे संरक्षण करणे ही जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य आहे - राहुल मोरे

Beed

वन्यजीवांचे संरक्षण करणे ही जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य आहे - राहुल मोरे

बीड/प्रतिनिधी

सबंध जग कोरोना महामारी मुळे त्रस्त असताना शेवटी त्याच्या कामी निसर्गच आला हे संबंध जगाने अनुभवले आहे,म्हणून निसर्ग नियमांचे काटेकोर पालन करणे व आपल्या निसर्ग संपत्तीची जपून करून वाढवून वन्य जीवाचे सर्व मिळून त्याचे संरक्षण,संवर्धन आणि जतन करण्याची गरज आज आहे, असे आवाहन क्रीडा शिक्षक राहुल मोरे यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त केले आहे.

निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे ही बाब सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे व कोणतीही नैसर्गिक हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत चाललेल्या मानवाच्या गरजा ही वाढत असून यामुळे मर्यादीत संसाधनामध्ये अमर्याद गरजा पूर्ण करण्याचा दबाव असून त्यामुळे ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढतच आहे. तापमानात बदल होताना आपणास दिसत असून कधी तिव्र उन्ह तर कधी गारठुन टाकणारा गारवा तर कधी अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत असून पर्यावरणाचे चक्र बिघत असल्याचे दिसून येते आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये सातत्याने वाढ होताना आपण बघत आहोत,त्याला सामोरे जात आहोत‌. ऑक्सिजन,स्वच्छ सूर्यप्रकाश,पाणी,अन्न उत्पादन साखळी,नैसर्गिक संसाधने,तापमान याचा 'समतोल' ही निसर्गाची देणगी असून या प्रयत्नात प्रत्येकाचा सहभाग असणे ही काळाची गरज आहे,कारण मुळात सर्व जीव जगले तरच मानवाचे अस्तित्व टिकेल

वन्यजीवांचे संरक्षण करणे ही जबाबदारी आहे,यात लहानपासून मोठ्यापर्यंत विशेषता तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

आपली वनसंपदा,वन्यजीव सृष्टी जर आपणच उघड्या डोळ्याने नष्ट होताना बघत राहिलो तर भविष्यकाळ आपणास कधीच माफ करणार नाही, वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन याविषयी त्यांच्यात जागृती होणे आवश्यक असून वन्यजीवांच्या संरक्षण करणे ही जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही आवाहन क्रीडा शिक्षक राहुल मोरे यांनी केले आहे.

 

 

Sharing

Visitor Counter