महसुल पथकांच्या गाडीचा अपघात; मंडळ अधिकारी ठार 

Beed

महसुल पथकांच्या गाडीचा अपघात; मंडळ अधिकारी ठार 

गेवराई/वार्ताहार 

बीडचे तहसिलदार व त्यांच्या सोबत अन्य दोनजन हे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कार्यवाई करण्यासाठी गेले असता सावळेश्वर जवळ त्यांच्या गाडीला वाळूच्या हायवाने गाडीला धडक दिली व त्याची कार झाडावर जाऊन आदळली या अपघातात पिंपळनेरचे मंडळ अधिकारी यांचा मृत्यू झाला असुन तहसिलदार गंभीर जखमी झाले आहेत .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बीड महसुल पथकाला मिळाली होती त्यावरून बीडचे तहसिलदार डोपे व मंडळ अधिकारी नितीन जाधव व अन्य एकजन यांनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान सावळेश्वर परिसरात कार्यवाईसाठी जात असतानां त्याच्या गाडीला एका वाळुच्या गाडीने त्यांच्या गाडीला कट मारला व महसुल पथकाच्या गाडी झाडाला आदळून हा अपघात झाला असल्याची माहिती आहे या अपघातात पिंपळनेरचे मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा मृत्यू झाला व अन्य दोनजन गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णलयात उपचार सुरू आहेत

Sharing

Visitor Counter