शासकीय तंत्रनिकेतन येथील प्रिंटिंग टेकनॉलॉजी कोर्सची प्रवेश क्षमता पूर्ववत ६० विद्यार्थीची करा

शासकीय तंत्रनिकेतन येथील प्रिंटिंग टेकनॉलॉजी कोर्सची प्रवेश क्षमता पूर्ववत ६० विद्यार्थीची करा
डॉ. गणेश ढवळे, मनोज जाधव आणि शार्दुल देशपांडे यांची मागणी
बीड/प्रतिनिधी
प्रिंटिंग टेकनॉलॉजी ( मुद्रण तंत्र ) पदविका अभ्यासक्रम हा शासकीय तंत्रनिकेतन , बीड येथील १९९६ पासून सुरु आहे. सर्वात जास्त यशस्वी व रोजगाराची १००% हमी देणारा हा कोर्स आहे. सदर कोर्स हा महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि बीड येथेच उपलब्ध आहे. सदर कोर्सची बीड येथील प्रवेश क्षमता ६० असताना काही "नाटाळ" मंडळींनी कुटील डाव आखत वरिष्ठांची दिशाभूल करून ही प्रवेश क्षमता ६० वरून ३० केली गेली असल्याचे समजते .तसेच कमी केलेल्या प्रवेश क्षमतेचा दाखला देत हा कोर्स बंद किंवा स्थलांतरित करण्याचे कारस्थान पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा या कोर्स ची प्रवेश क्षमता
पूर्ववत ६० करण्यात यावी अशी मागणी डॉ. गणेश ढवळे, मनोज जाधव, शार्दुल देशपांडे, महेश धांडे, अशोक येडे, राजेंद्र आमटे, शेख युनूस , अशोक कातखडे आदींनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कीली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे धोरण ठेऊनच महाराष्ट्र शासनाने हा कोर्स बीड येथे सुरु केला होता. हा कोर्स सुरु झाल्यापासून आजतागायत बीड व आसपासच्या इतर जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब, शेतकरी, ऊसतोड, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक कुटुंबातील मुलांच्या नोकरीचा व पर्यायाने असंख्य कुटुंबांच्या उद्धाराचा स्रोत ठरला आहे . सदर कोर्सची प्रवेश क्षमता ६० असताना दरवर्षी ६० विद्यार्थ्यांचे नोकरीला रुजू होणे हे नक्की आहे.
परंतु काही "नाटाळ" मंडळींनी कुटील डाव आखत वरिष्ठांची दिशाभूल करून ही प्रवेश क्षमता ६० वरून ३० केली गेली असल्याचे समजते . प्रवेश क्षमता कमी केल्यामुळे प्रथम वर्षातील ३० व थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणारे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी रोजगाराच्या संधीपासून वंचित राहणार आहेत . तसेच कमी केलेल्या प्रवेश क्षमतेचा दाखला देत हा कोर्स बंद किंवा स्थलांतरित करण्याचे कारस्थान पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा हा कोर्स बीड मधून बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा जर शासनाचा मानस असेल तर बीड जिल्ह्यातील सर्व गोरगरीब, शेतकरी, ऊसतोड, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक कुटुंबातील विद्यार्थी , सर्व राजकीय पक्ष , सामजिक संघटना लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभा करतील आणि याची सर्वात १४ मार्च सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण करून करण्यात येईल असेही निवेदनात म्हंटले








