सेंट अँन्स सोशल सेंटरच्या वतीने पाली गावात जागतीक महिला दिन साजरा

सेंट अँन्स सोशल सेंटरच्या वतीने पाली गावात जागतीक महिला दिन साजरा
सात वर्षाच्या आबोलीच्या भाषणाला गावात शुभेच्छांचा वर्षाव
बीड/वार्ताहर
जागतीक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आलं.मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांकडे समान नजरेने पाहिले पाहिजे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त महिलांनी मोठ-मोठ्या पदावर जबाबदारीची कामगिरी पार पाडली आहे. स्त्री कुठल्याही क्षेत्रात आपली तिला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू शकते. पण तिला समाजातून प्रोत्साहन मिळणे महत्वाचे आहे, असे प्रतिपाद सेंट अँन्स सोशल सेंटरच्या संचालिका अॅनी जोसेफ मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना बोल्या.
तसेच महिलांना मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे म्हणाल्या की मुलींनी किती प्रमाणावर मोबाईल वापरावं ,आपल्या मुली वाईट वळणावर गेल्या तर आईला तात्काळ समजलं पाहीजे,तसेच मुलींनी फालतू गोष्टीच्या नादी लागू नये, शिक्षणाकडे जास्त प्रमाणावर भर द्यावं,आणि लग्नाची घाई न करता स्वतःच्या पायावरती उभारावा. आयुष्यात एकदा स्वतःच्या पायावरती उभा राहिले तर आयुष्यभर चांगलं राहाल.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी वीर या युवतीने केले तर कार्यक्रमाचे आभार नेहा वीरने मानले या कार्यक्रमास उपस्थित पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे,गावाचे सरपंच दशरथ अण्णाभाऊ,उपसरपंच विजयाताई,मराठी पत्रकार संघाचे महिला उपाध्यक्ष आयेशा शेख,व सेंट अँन्स सोशल सेंटरच्या संचालिका अॅनी जोसेफ मॅडम व गावातील महिला उपस्थित होते.अॅड शेख शफीक भाऊ,रेखाताई क्षिरसागर, पत्रकार संदिपजी बेद्रे सर,अॅड.आस्मा पटेल,पठाण रेहानाताई, संज्ञाताई राजपुत,अर्चनाताई सानप,आदी उपस्थित होते.








