जागतिक महिला दिनानिमित्त विधवा महिलांचा सन्मान

Beed

जागतिक महिला दिनानिमित्त विधवा महिलांचा सन्मान

बीड/वार्ताहर 

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आज अंथरवण पिंपरी तालुका बीड या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश गिरी (महाराष्ट्र लोक विकास राज्य कार्यकारीणी सदस्य )तसेच विधवा महिला सन्मान अभियानाच्या बीड जिल्हा समन्वयक ललिता तांबारे लेक लाडकी अभियान चे जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, मल्लीका दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विधवांना सन्मान देणे ही काळाची गरज आहे. समाजात पसरत चाललेली अंधश्रद्धा यावर मात करून विधवा महिलांना सन्मान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन ओम प्रकाश गिरी यांनी केले, समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते परंतु महिला या अबला नसून सबला आहेत पुरुषांच्या तुलनेत महिला अग्रेसर असून बचत गट,घर संसार व सर्व सामाजिक जबाबदाऱ्या महिला उत्तम प्रकारे पार पाडतात परंतु महिलेचा पती वारल्यानंतर त्यांना समाजात दुय्यम दर्जा देण्यात येतो विधवा म्हणून महिलांची होणारी हेळसांड थांबली पाहिजे विधवा महिलांचा सन्मान करणे यासाठी कायदा होणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहेत यासाठी विधवा महिला सन्मान अभियानाच्या वतीने गावोगावी जाऊन विधवा महिला सन्मान कायदा व्हावा यासाठी बीड जिल्ह्यातील ललिता तांबारे यांच्यासारख्या कार्यकर्त्या पुढे आलेल्या आहेत व विधवा महिलांच्या कायद्याची अंमलबजावणी स्वतः पासून सुरु करावी या बाबत जनजागृती त्या करत आहेत यांच्या कार्याला मानाचा मुजरा कार्यक्रम प्रसंगी गावातील बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन निवेदन तयार करून हे स्वाक्षरीचे निवेदन सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले

Sharing

Visitor Counter