आरटीई प्रवेशासाठी ४ हजार ९९६ अर्ज दाखल

आरटीई प्रवेशासाठी ४ हजार ९९६ अर्ज दाखल
लवकरच लॉटरी पद्धतीने पात्र विद्यार्थी निवडले जाणार
बीड/प्रतिनिधी
शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले असून जिल्ह्यत तब्बल ४ हजार ९९६ पालकांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया १८ फेब्रुवारीला सुरू झाली होती. दरम्यान सुरवातीला २ मार्च पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती ती वाढवून १० मार्च पर्यंत देण्यात आली. मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला होता .
जिल्ह्यात आरटीई पात्र २२७ शाळांचा समावेश असून १ हजार ९०८ जागांसाठी १० मार्चपर्यंत ४ हजार ९९६ अर्ज आले आहेत. म्हणजे उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक अर्ज आल्याने प्रवेशासाठी चांगलीच तारांबळ उडणार आहे. यात लवकरच लॉटरी पद्धतीने पात्र विद्यार्थी प्रवेशासाठी निवडले जातील आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज भरते वेळी नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर sms पाठवून महती दिली जाईल परंतु पालकांनी sms वर अवलंबून नराहता वेब साईट वरती अर्जाची स्थिती वर क्लिक करून शाहानिशा करावी असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आह.
चौकट:-
आपल्या पाल्याचा आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश व्हावा यासाठी अनेक पालकांनी नामी शक्कल लावत कागदपत्रांची जुळवाजुळव आणि अफरातफर केली आहे . हे कटाक्षाने शोधून पडताळणी समितीने बोगस प्रवेश रोखणे गरजेचे आहे. जेणेकरून खरे गोरगरीब विद्यार्थी या प्रवेशास पात्र ठरतील असे मत मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.
तालुका निहाय दखल झालेल्या अर्जांची संख्या
तालुके. प्रवेशासाठी दखल
झालेले अर्ज
अंबाजोगाई ८४३
आष्टी ६७
बीड + बीड शहर १३८४
धारूर १३६
गेवराई ७१८
केज २६७
माजलगाव ६११
परळी ७५५
पाटोदा ४७
शिरूर ९५
वडवणी ७३
एकूण ४९९६








