अलहुदा उर्दू हायस्कूल बीड येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Beed

अलहुदा उर्दू हायस्कूल बीड येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न 

बीड/प्रतिनिधी 

नुर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी बीड द्वारा संचलित अलहुदा उर्दू हायस्कूल शहिंशाह नगर बीड येथे शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले सदर निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष मा.लालसाहब हनगी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मॅक्सक्योर हॉस्पिटलचे संचालक डॉ शेख फेरोज़ आणि वरिष्ठ पत्रकार संपादक अॅड शेखर कुमार आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक डाॅ सिराज खान आरजू यांनी प्रास्ताविक करत शाळेत होणार्‍या विविध शैक्षणिक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. वर्ग नव्वी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .सहशिक्षक शेख मोइजोद्दीन व सय्यद रहबर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे मॅक्सक्योर हॉस्पिटलचे संचालक डॉ शेख फेरोज़ मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वैदण्यानिक दृष्टीकोनातून विचार करावा तसेज महामारीच्या काळात काय करावे व काय करु नये या विषयी ज्ञान बाळगावे व ते अमलात आणावे. वरिष्ठ पत्रकार संपादक अॅड शेखर कुमार मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये ध्येय प्राप्तीसाठी जिद्द व मेहनत करण्याची तयारी असावी. अध्यक्षीय भाषण करताना नुर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष मा.लालसाहब हनगी म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इमानदारीने मेहनत करावी. यश घडवून आणण्यासाठी तिचा ध्यास घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. धरसोड करणार्‍या व्यक्तीस कोणतंही यश मिळत नाही. तुमचे श्रम, वेळ, लक्ष, मेहनत विखुरले जाऊ नये याकडे लक्ष द्या. कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थीयांना विविध पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक मुहम्मद रफीक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी सय्यद मुबशिरा व सांस्कृतिक विभाग प्रमुख शेख अब्दुल हमीद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सर्वे शिक्षक वर्गासह शिक्षकेतर कर्मचारी शेख रफीक, शेख मसुद, युनूस खान आदींनी परिश्रम घेतले.

Sharing

Visitor Counter