कोरोना महामारित भाजपाचे गलिच्छ राजकारण -बाळासाहेब गर्जे

कोरोना महामारित भाजपाचे गलिच्छ राजकारण -बाळासाहेब गर्जे
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
अमेरिका, इटली, यासारख्या प्रगत देशांमध्ये कमी लोकसंख्या, उत्तम आरोग्ययंत्रणा, स्वच्छतेबाबत जागरुकता असतानाही लाखाने कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे व मृत्युचे थैमान चालू आहे. महाराष्ट्र राज्यात ठाकरे सरकार कोरोना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे सामान्य माणसाला माहिती आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष नेते व भारतीय जनता पक्ष कोरोना विरोधातील लढ्यात काम करत असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला, दोष देण्याचे गलिच्छ राजकारण करत आहेत असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गर्जे यांनी प्रशिध्दी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढु नये यासाठी संपूर्ण देशात लाॅक डाउन लागु करण्यात आला होता.मागील दोन महिन्यांपासून राज्य सरकार डोळ्यात तेल घालून चोवीस तास काम करत आहे.गोरगरीब,मजुर यांची उपासमारी होऊ नये यावर लक्ष ठेवून आहे.परंतु भारतीय जनता पार्टी सत्तेपासून दुरावली असल्याने कोरोना महामारीच्या संकटकाळात महाराष्ट्र बचाव चा नारा देत फुले, शाहू, आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण करत आहे.हे निंदनीय आहे.








