गुणवंतांचा भाजपनेते आडसकर यांच्या हस्ते मैंदवाडीत सत्कार

Beed

गुणवंतांचा भाजपनेते आडसकर यांच्या हस्ते मैंदवाडीत सत्कार

धारुर/प्रतिनिधी

तालुक्यातील मैंदवाडी येथील गुणवंतांचा भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिद्द, चिकाटी, मेहनतीने ध्येय गाठता येते हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केल्याचे श्री. आडसकर म्हणाले. दुर्गम व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांचे यश हे इतर तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचेही रमेशराव आडसकर म्हणाले.

तालुक्यातील मैंदवाडी येथील प्रतिक्षा विजय आंधळे हीची वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला, दादासाहेब बबन मैंद यांची प्राध्यापक म्हणून निवड झाली, विशाल शामराव मैंद यांनी वकिलीची पदवी मिळविली, अशोक वडणे व नितीन वडणे यांची पोलिस दलात निवड झाल्याबद्दल या गुणवंतांचा रमेशराव आडसकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी सरपंच सचिन मैंद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Sharing

Visitor Counter