नगरपालिकेत उर्दू बोर्ड लावायचा आणि इकडे मात्र मुस्लिम नेतृत्वचं संपूण टाकायचे-शेषेराव तांबे

नगरपालिकेत उर्दू बोर्ड लावायचा आणि इकडे मात्र मुस्लिम नेतृत्वचं संपूण टाकायचे-शेषेराव तांबे
क्षीरसागरांची प्रभाग रचनेची खेळी नियतिलाही अमान्य...शेषेराव तांबे
बीड/प्रतिनिधी
बीड नगर परिषदेने शासनाच्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचना जाहीर केली होती परंतु ती नेमकी कोणते निकष लावून तयार करण्यात आली यात मात्र गौडबंगाल दिसून येते बीड शहरामध्ये मुस्लीम मतदार बहुसंख्यांक असल्याने यांचे नेतृत्व कमी करण्यासाठी क्षीरसागर बंधूंनी कुटील डाव खेळत प्रभाग रचना तयार केली होती परंतु ती नियतीला ही मान्य झाली नाही.
बीड नगर परिषदेच्या करण्यात आलेल्या नवीन प्रभाग रचनेनुसार मुस्लिम नगरसेवक कमी करण्याचा क्षीरसागर यांचा डाव अखेर नियतीला अमान्य झाला . विद्यमान बीड नगरपालिकेत 20 नगरसेवक मुस्लिमांचे असून त्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्यासाठी क्षीरसागर यांनी कूटनीतीचा वापर करून मुस्लिम नगरसेवक निवडून येऊ नयेत म्हणून प्रभागाची रचना अशी केली कि प्रत्येक प्रभागातील मुस्लीम मतदान कमी केले होते . यासंदर्भात मुस्लिम समाजामध्ये क्षीरसागर विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला असून सर्व पक्षातील नेते एकत्रित आले व या प्रभाग रचनेच्या विरोधात कोर्टामध्ये जाण्यासाठी सज्ज झाले होते परंतु हा क्षीरसागराचा कूटनीतीचा डाव निसर्गालाही अमान्य झाला आणि तमाम महाराष्ट्रातील लागू केलेले विभागवार रचना संपूर्ण रद्द करण्यात आली . बीड शहरामध्ये मुस्लिम समाजाचे मतदान सर्वात जास्त असल्यामुळे या समाजाला सत्तेतून वंचित ठेवण्याचे पाप हे क्षीरसागर यांनी आजपर्यंत केला आहे परंतु भविष्यात त्यांना आता सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिम बांधव एकवटला असून खऱ्या अर्थाने शिवसंग्रामच्या माध्यमातून आ.विनायकराव मेटे यांनी मुस्लिम प्रभागातील उमेदवारी मुस्लिम तरुणांना जाहीर केली परंतु असा कोणताच प्रयत्न क्षीरसागरांनी केलेला दिसून येत नाही . नगरपालिकेत मात्र उर्दू बोर्ड लावायचा आणि इकडं मुस्लिम नेतृत्व मात्र राजकारणातून हद्दपार करण्याचा कुटीलडाव क्षीरसागर खेळत आहेत परंतु आजचा सुशिक्षित मुस्लिम बांधव त्यांचा हा डाव हाणून पाडेल यात तिळमात्र शंका नाही असे शिवसंग्रामचे उपशहर अध्यक्ष शेषेराव तांबे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे








