बालेपीर प्रभाग क्रमांक १२ मध्ये अटल अमृत योजनेचे पाणी सोडा

बालेपीर प्रभाग क्रमांक १२ मध्ये अटल अमृत योजनेचे पाणी सोडा
डॉ. भारत भूषण नगर, खतीजा नगर, गोरे वस्ती च्या उरलेल्या भागात अटल अमृत योजनेची पाईपलाईन टाका - शेख मोहसीन
बीड/प्रतिनिधी
शहरातील बालेपीर प्रभाग क्रमांक १२ मध्ये अटल अमृत योजनेचे पाणी सोडा व डॉ. भारत भूषण नगर, खतीजा नगर, गोरे वस्ती च्या उरलेल्या भागात अटल अमृत योजनेची पाईपलाईन टाका अशी मागणी शेख मोहसीन,शेख जहीर, शेख यासीन, शेख माजेद यांनी बीड नगर परिषद प्रशासकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहराच्या अनेक भागात नगरपालिकेकडून अटल अमृत योजनेचे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे त्या-त्या प्रभागातील नागरिकांची पाण्याची सोय झाली आहे. मात्र बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये जवळपास वर्षभरापासून टाकण्यात आलेली अटल अमृत योजनेची पाईपलाईन असूनही या प्रभागाला या योजनेच्या पाण्यापासून अजूनही दूर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रभागाच्या जवळ असलेल्या भक्ती कन्स्ट्रक्शन या वसाहतीमध्ये सुद्धा अटल अमृत योजनेच्या पाईप लाईनने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र जवळच असलेल्या प्रभाग क्रमांक १२ अटल अमृत योजनेच्या पाण्यापासून अजूनही वंचित ठेवण्यात आलेला आहे. असे का ? याशिवाय डॉ. भारत भूषण नगर, खतिजा नगर व गोरे वस्ती यातील बराचसा भाग बीड नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेला असल्याने प्रभाग १२ मधील या तिन्ही भागात नगर पालिकेने टाकलेली जुनी पाइपलाइन आहे. मात्र या तिनही भागात अजूनही अटल अमृत योजनेची नवीन पाईप लाईन टाकलेली नसल्याने या भागात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. म्हणून या भागात अटल अमृत योजनेची नवीन पाईप लाईन टाकणे आवश्यक आहे. तरी या तिन्ही नगरात अटल अमृत योजनेची पाईप लाईन लवकरात लवकर टाकावी. आणि प्रभाग क्रमांक १२ च्या संपूर्ण हद्दीत अटल अमृत योजने चे पाणी नागरिकांसाठी सोडण्यात यावे. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढू लागला आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. शिवाय १५ दिवसांनी इस्लामचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. रमजानचे रोजे धरणाऱ्या रोजेदारांना विना त्रास पाणी उपलब्ध करून देणे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. तरी मे. साहेबांनी या सर्व बाबी व पार्श्वभूमी लक्षात घेता प्रभाग क्रमांक १२ सह उपरोक्त उल्लेख केलेल्या तिन्ही नगरांमध्ये अटल अमृत योजनेचे चे पाणी व अर्धवट सोडून देण्यात आलेली पाईपलाईन पूर्ण करून जनतेला त्रासातून वाचवावे. अशी मागणी समाजसेवक शेख मोहसीन, शेख जहीर, शेख यासीन, शेख माजेद यांनी बीड नगर परिषद प्रशासकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.








