कार व मोटरसायकलच्या अपघातात दोन जण ठार

कार व मोटरसायकलच्या अपघातात दोन जण ठार
माजलगाव/प्रतिनिधी
तालेवाडी येथील नातेवाईकांना भेटून राष्ट्रीय महामार्ग ओलांडत गावाकडे येत असताना कार - मोटरसायकल अपघातात दिवसभर दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे . ही घटना राष्ट्रीय महामार्ग माजलगाव तेलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी फाटा येथे शनिवार दि . १ ९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे .
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव वय ( ३५ ) वर्ष लक्ष्मण भिमराव विघ्ने वय ( ४५ ) ईश्वर सिद्धेश्वर जाधव वय ( १० ) वर्ष मोटार सायकल वरून नातेवाईकांना भेटायला गेले होते . नातेवाईकांची विचारपूस करून गावाकडे परत येत होते . यावेळी राष्ट्रीय महामार्ग ओलाडंताना माजलगाव कडून तेलगाव कडे जाणाऱ्या ईलटीका कार क्रमांकाह ४४ , ड- ३२०३ गाडीने जोराची धडक दिली . या जोरदार धडकेत मोटार सायकलचा चुराडा होऊन मोटार सायकलवरील सिद्धेश्वर जाधव व लक्ष्मण विघने यांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू आला . तर सिद्धेश्वर जाधव यांचा दहा वर्षाचा मुलगा ईश्वर जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले आहे .








