इन्स्पायर व अल-अक्सा कोचिंग क्लासेस यांच्या वतीने जिल्हा स्तरीय ड्रॉईंग कॉम्पिटिशनचा आयोजन.

इन्स्पायर व अल-अक्सा कोचिंग क्लासेस यांच्या वतीने जिल्हा स्तरीय ड्रॉईंग कॉम्पिटिशनचा आयोजन.
बीड/वार्ताहर
इन्स्पायर व अल-अक्सा कोचिंग क्लासेस यांच्या वतीने गेल्या चार वर्षापासून बीड जिल्हा स्तरीय ड्रॉईंग कॉम्पिटिशन ठेवण्यात येत होता. ही परंपरा चालू ठेवत कोचिंग क्लासेसच्या डायरेक्टर सय्यद अरफात सर आणि मोमिन तौसीफ सर यांनी यावर्षी सुद्धा बीड जिल्हा स्तरीय ड्रॉईंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं सदरील कॉम्पिटिशन मध्ये जिल्ह्यातील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हा कॉम्पिटिशन आज सर सय्यद शाळेत मा. आमदार सय्यद सलीम यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे शेख शफीक भाऊ, अब्दुल वकील सर, मुश्ताक अन्सारी सर, मतीन मेंबर, मकसुद खान, मजेद क़ुरेशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कॉम्पिटिशनमध्ये प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस म्हणून सायकल, स्टडी चेअर आणि ड्रॉइंग बोर्ड + किट व इतर पन्नास बक्षिसे दोनही गटासाठी ठेवण्यात आले आहे. सदरील कॉम्पिटिशन चा बक्षीस वितरण सोहळा दिनांक 27 मार्च रोजी होणार असल्याचे माहिती अरफात सर आणि तौसीफ सर यांनी दिली आहे.








