बीड नगरपरिषद सत्ताधाऱ्यांकडून रु १० कोटी गुंठेवारी रकमेचा गैरवापर होत आहे-शेषेराव तांबे

Beed

बीड नगरपरिषद सत्ताधाऱ्यांकडून रु १० कोटी गुंठेवारी रकमेचा गैरवापर होत आहे-शेषेराव तांबे

 जिल्हाधिकारी साहेब नारळ गँगला लगाम लावावा...शेषेराव तांबे

बीड/वार्ताहर

बीडच्या नगरपालिकेने गुंठेवारीतून मिळवलेला कर स्वरुपातील पैसा हा जनतेच्या अत्यावश्यक सुविधेवर खर्च केला जावा असे सरकारचे लिखित आदेश आहेत . बीड शहरातील पथदिव्यांचे वीज बिल थकीत ठेवून बीड करांना अंधारात ठेवलं ,पिण्याच्या पाण्यावरील खर्च .. गुत्तेदारीवर करून बीडच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवलं आणि तो दहा कोटी पेक्षा अधिकचा पैसा फक्त स्वतःचे नातेवाईक , आजी माजी नगरसेवक व गुत्तेदार पोसण्यासाठी रस्त्याकडे वळवला .विशेष म्हणजे असे करता येत नाही असे राज्यसरकारचे लेखी आदेश असताना ही हा मनमानी कारभार नगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी व माजी सत्ताधारी मिळून करत आहेत . या मनमानी कारभाराच्या  भ्रष्टाचाराला जिल्हाधिकारी साहेबांनी लगाम लावावा अशी बीड येथिल नागरिकांच्या वतीने व शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या वतिने  जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले .गेल्या वर्षात 10 कोटी रूपया पेक्षा अधिक रक्कम नगर परिषदेकडे गुंठेवारीची जमा आहे. हि रक्कम शासकीय परिपत्रकान्वये कुठे व कशी खर्च करायची आहे. हे नगर विकास सचिवांनी एका परिपत्रकाव्दारे मार्गदर्शित केलेले आहे. परंतु न.प.कॉन्सील बरखास्त होण्यापुर्वी सत्ताधाऱ्यांनी बेकायदेशीर ई-टेन्डर न करता नियम बाहय टेंडर साठी गल्लो-गल्ली नारळ घेवून ही नारळ गँग सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करीत फिरत आहे. ज्या अर्थी गुंठेवारीचे हे पैसे केवळ अति आवश्यक सेवा जसे की विजबिल, पिण्याचे पाणी, स्वच्छते वरच खर्च करण्यासाठी शासनाचे आदेश आहेत. गुंठेवारीचे हे पैसे गुत्तेदाराला जोपासण्यासाठी अथवा भावी व माजी नगर सेवकाला सांभाळण्यासाठी नाही.

    ज्या अर्थी शासनाने न.प. चे अर्थिक व्यवहार महाराष्ट्र म्युंसिपल अकाऊंड कोड 1973 हे कायदयाप्रमाणे व्हावे हे बंधनकारक असतांना सुध्दा न.प.अकाउंटचे उल्लंघन करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून 10 कोटी गुन्टेवारीच्या रक्कमेचे बेकायदेशीररित्या मतदारांना अमिष दाखवण्याचे काम करत आहेत. आपण सध्या न.प. वर प्रशासक म्हणून कार्यरत आहात हया नियमबाहय 10 कोटी खर्चाची नैतिक जबाबदारी न.प.प्रशासन आहे. म्हणुन याची संपूर्ण चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्यावर नियमानुसार कारवाई करावी आणि गुंन्टयावारीचे 10 कोटी रूपये जनतेची अति आवश्यक सेवा विदयुत, पाणी, स्वच्छतेवर खर्च करावा. गुत्तेदाराला जोपासण्याचे काम बंद करावे व गुंठेवारीचे 10 कोटी रक्कमेची संपूर्ण चौकशी करून नारळ गँगला आळा घालावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,शहराध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर कोकाटे,ओबीसीआघाडीचे शिवराम शिरगिरे,सामाजिक न्यायाचे ढोकणे यांनी नगरपालिका प्रशासन व मा.जिल्हाधिकारी बीड यांना सादर केले.

Sharing

Visitor Counter