अंबड मध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह , जिल्ह्याची रुग्णसंख्या 61

Beed

अंबड मध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह , जिल्ह्याची रुग्णसंख्या 61

अंबड़/अक्षय गोरुले

अंबड शहरातील नाईकवाडी भागातील एक 55 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नुकताच जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला असून यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 61 वर पोहचली असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयातर्फे शुक्रवारी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेल्या एकूण 108 संशयीत रुग्णांपैकी सहा जणांचे अहवाल प्रयोग शाळेकडे प्रलंबित होते.त्यात अंबड येथील नाईकवाडी भागातील 55 वर्षीय महिलेचाही समावेश होता. प्रयोग शाळेकडून सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 61 वर पोहचली असून पंधरा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर आज रविवार पर्यंत सुट्टी देण्यात आल्याचे या सुत्रांनी स्पष्ट केले आहे

Sharing

Visitor Counter