धक्कादायक ! केई एम रुग्णालयातील शवागृह भरले ... शवागृहात जागा नसल्याने बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये मृतदेह ठेवण्याची नामुष्की?

धक्कादायक ! केई एम रुग्णालयातील शवागृह भरले ... शवागृहात जागा नसल्याने बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये मृतदेह ठेवण्याची नामुष्की?
मुंबई दिनांक 25
कोरेनाचे संकट दिवसा गणित वाढत आहे. मुंबईतील कोरोना चा गुणाकार हा कमी झाला असला तरी रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कोरोना बांधीत रुग्णांच्या मृतदेहांची केईएम रुग्णलयातील शवागृह भरले आहे. धक्कादायक बाप म्हणजे शवाग्रहात मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याने बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ रुग्णालयात प्रशासनावर आली आहे..मुंबईतील महत्त्वाच्या रुग्णांपैकी के एम रुग्णालय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेतला येथे कोरोना बाधित रुग्ण जास्त येत आहेत. तसेच कोरूनाच्या विषाणू मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. 27 मृतदेह ठेवण्याची शेवागृहाची क्षमता संपल्याने 10 मृतदेह कॉरिडॉरमध्ये खाण्याची वेळ मुंबई पालिकेच्या रुग्णालय प्रशासन वर आली आहे..
केईएम रुग्णालयात सध्या एकूण 37 मृतदेह आहे. तसेच गेल्या दोन दिवसात शवागृहातील सात कर्मचाऱ्यांनाही कोरोना ची लागण झाली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शवाग्राहत आता कर्मचाऱ्यांची कमतरता जानू लागली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. शवाग्रहात जागा कमी, रुग्णालयात कर्मचारी कमी, या कात्रीत प्रशासन सापडल्याचे दिसून येत आहे.








