वडवणी शहरातील बँकांसमोर नागरिकांची मोठी गर्दी!
Wadwani

वडवणी शहरातील बँकांसमोर नागरिकांची मोठी गर्दी!
वडवणी प्रतिनिधी/प्रमिला माळी
वडवणी शहरातील नागरिकांची गर्दी बॅंका समोर मोठ्या प्रमाणावर पाहण्यास भेटली काल जिल्हा अधिकारी यांनी
नविन अदेशाप्रमाने काल पासून काही व्यवसायंना चालु करण्यास परवानगी दिली मात्र यासोबतच सोशलडिस्टन चा वापर देखील करण्यात सांगितले परंतु आजचा पहिला दिवस असल्यामुळे नागरीकांनी बॅंका समोर तुफान गर्दी केली होती.
ज्यार्थी राज्यशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून लोकांना गर्दी करण्यास टाळण्याचे सांगितले परंतु याठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहण्यात भेटली या ठिकाणी नागरिकांनी केलेली गर्दी अकाउंट वरती पाचशे रुपये जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती








