गोरक्षनाथ टेकडी येथे मंळवार दि.14 जून रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज गर्जे यांचे कीर्तन
Beed

गोरक्षनाथ टेकडी येथे मंळवार दि.14 जून रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज गर्जे यांचे कीर्तन
बीड/प्रतिनिधी
विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 24 व्या वर्षातील दहावी पुण्यतिथी जेष्ठ शुद्ध. पौर्णिमे निमित्त श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी ता.जि.बीड येथे ह.भ.प.जगन्नाथ महाराज गर्जे शास्त्री कोरेगाव जि.अहमदनगर यांचे मंगळवार दि.14 जून 2022 रोजी दुपारी 12 ते 2 या दरम्यान कीर्तन होणार आहे. तरी या किर्तनाचा व महाप्रसादाचा या परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे गुरूवर्य शांतीब्रह्म ह.भ.प.नवनाथ महाराज व समस्त गावकरी मंडळी मानकुरवाडी ता.जि.बीड यांनी केले आहे. तसेच गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भांद्री पर्वत प्रदक्षिणामध्ये सकाळी 9 ते 10 यावेळेत सहभागी होता येईल.








