बीड जिल्ह्यासाठी खुशखबर!कोरोना रूग्ण होत आहेत कोरोना मुक्त!

Beed

बीड जिल्ह्यासाठी खुशखबर!कोरोना रूग्ण होत आहेत कोरोना मुक्त!

बीड प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरगाव केल्यानंतर बीड जिल्हा खूप चिंताग्रस्त होता बीड जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता मात्र मुंबई पुण्यावरून आलेल्या लोकांनी बीड जिल्हा वासियांची खूप मोठ्या प्रमाणावर चिंता वाढवली होती मात्र बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनावर मात केली.

आज बीड जिल्ह्यात कोरोनावर मात करून 14 जन पुर्णपणे बरे होऊन घरी जात आहेत आता एकूण बीड जिल्ह्यातून कोरोना मुक्त झालेल्या लोकांची संख्या 29 झाली आहे तर  माजलगाव,केज, गेवराई कोरोना मुक्त झाले आहेत.

यात एकाचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत 15 जण करोना मुक्त झाले होते 6 रुग्णांला पुण्याला पाठविले होते त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 41 रुग्णावर उपचार सुरु होते.

यातील माजलगाव तालुक्यातील 13 व बीड शहरातील 1ची  प्रकृती ठणठणीत झाल्याने घरी पाठविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर बी पवार यांनी दिली आहे.

Sharing

Visitor Counter