विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शाहु महाराजांची जयंती साजरी

Beed

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शाहु महाराजांची जयंती साजरी

बीड/प्रतिनिधी 

‘वाचाल तर वाचाल’ फिरते मोफत वाचनालयाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 148 वी जयंती अम्रपाली बुध्द विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (पुरग्रस्त कॉलनी, बीड) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाहु महाराज यांच्या विचाराला अभीप्रेत असलेली जयंती साजरी करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ‘शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे’, हे पुस्तक वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ए. एल. औसरमल तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरसिंह ढाका, प्रशांत वासनिक, कॅप्टन राजाभाऊ आठवले, जी. एम भोले यांची उपस्थिती हाती. सर्वप्रथम तथागत गौतम बुध्द आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अमरसिंह ढाका म्हणाले, ‘बहुजन हिताय- बहुजन सुखाय’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात राज्यकारभार केला. त्या काळी अतिशय धाडसी निर्णय घेऊन बहुजणांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवले. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. यामुळेच राजर्षी शाहू महाराज खर्‍या अर्थाने रयतेचे राजे झाले. अशा थोर राजांचा जन्मदिवस प्रत्येकाने सनासारखा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कॅप्टन राजाभाऊ आठवले यांच्या हस्ते भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभीवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ‘वाचाल तर वाचाल’ वाचनालयाचे डी. जी. वानखेडे यांनी केले. यावेळी प्रशांत वासनीक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, फुले- शाहू- आंबेडकर यांनी समतेची स्थापना व स्वाभीमानाने जगण्यासाठी जे प्रयत्न आणि कार्य केले, ते कधीही विसरू नका. त्यांच्या मार्गाने जाण्यातच स्वहीत व देशहीत आहे, हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगीतले. कार्यक्रमास काशीनाथ वाघमारे, प्रकाश खंदारे, डी.एम. राऊत, बळीराम दळवी, भानुदास गायकवाड, बळीराम वाघमारे, चंद्राबाई ठोकळ, मोहीनी वाघमारे, आकांक्षा वारभुवन, किर्ती शिंदे व परिसरातील बहुसंख्य उपासक- उपासिका आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Sharing

Visitor Counter