ट्विनकलिंग स्टार शाळेच्या विद्यार्थांचे यश
Beed

ट्विनकलिंग स्टार शाळेच्या विद्यार्थांचे यश
बीड/वार्ताहर
टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन , इंडिया अंतर्गत घेण्यात येणाऱ्या क्रीडा महोत्सवात ,"ट्विनकलिंग स्टार" शाळेच्या इ. सातवीत शिकणाऱ्या यशवंत गणेश राठोड , अर्जुन विजय दहिफळे, अथर्व अर्जुन बांगर ,योगेश्वर लालाजी जाधव या विद्यार्थांनी जालना इथे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकत राष्ट्रीय स्तरावर , चेन्नई इथे खेळण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी कमावली आहे.
यावेळी पालकमंत्री राजेंद्र तुपे यांच्या हस्ते सर्व पारितोषिक मिळवण्याचा मान प्राप्त केला आहे.ट्विनकलिंग स्टार स्कूलचे प्राचार्य दीपक कुमार झा , स्कूल डायरेक्टर कोमाथ भास्करण आणि संचालक गणेश मेड यांनी विद्यार्थांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले .यासाठी त्यांचे शाळेसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








