तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिल्प निदेशक पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिल्प निदेशक पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माजलगांव करिता सैद्धांतिक व प्रात्यक्षिक (Theory & Practical) तासिका घेण्यासाठी निव्वळ तासिका तत्वावर व्यवसाय व पदसंख्याप्रमाणे तासिका शिल्प निदेशक यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणुक करावयाची आहे. करिता शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणा-या पात्र उमेदवारांनी दिनांक 27 जुलै 2022 पर्यंत सायं 5.00 वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था माजलगाव येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
उपलब्ध शिल्प निदेशकांची अभ्यासक्रम निहाय पदे पुढीलप्रामणे आहेत. विजतंत्री (1), जोडारी (1), सांधाता (1) आणि ऑपरेटर कम मॅकानिक (1) पदे आहेत.विजतंत्री व संधाता हे Unit युनिट प्रस्तावित आहेत. तसेच या पदांसाठी शैक्षणीक अर्हता ही संबंधीत शाखेतील पदवी / पदवीका / ITI+CITS किंवा CTI व अनुभव, पदवीसाठी 1 वर्ष / पदवीकासाठी 2 वर्ष/ आयटीआय साठी 3 वर्ष आवश्यक राहील. सदरील व्यवसायाची शिक्षकीय पदाची पात्रता संबंधीत व्यवसायाच्या शाखेप्रमाणे राहिल. पंम्प ऑपरेटर कम मेकॅनिक (POCM) (3) संबंधीत क्षेत्राचा फक्त पुर्णवेळ कामकाजाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.
सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माजलगांव, जि. बीड- 431142 या पत्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते सोबतचा अर्ज दिनांक- 27 जुलै 2022 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेच्या आत मिळेल अशा बेताने पाठवावा. (कार्यालयीन सुटीचे दिवस वगळून) विहित मुदतीच्या नंतर स्वहस्ते/पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त अर्जापैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखत/ कौशल्य चाचणी करिता तारीख E-Mai ,दुरध्वनीद्वारे कळविण्यांत येईल. अर्जाचा नमुना स्वतःच्या RESUME Format मध्ये सादर करावा / अथवा प्रत्यक्ष संस्थेत उपस्थित राहून कार्यालयातुन प्राप्त करुन घ्यावा, अनुभवी उमेदवारास नियमाप्रमाणे प्राधान्य देण्यात येईल. शासन निर्णय अन्वये सैध्दांतिकसाठी व प्रात्यक्षिकसाठी मानधन अनुज्ञेय राहील.पदसंख्येमध्ये बदल होवु शकतो. विजतंत्री (Electrician)- II nd Unit व संधाता (Welder) - II nd हे प्रस्तावित आहेत.








