आ.मेटे साहेब गोर-गरीब शेतकऱ्यांचे कैवारी - राजेंद्र आमटे

Beed

आ.मेटे साहेब गोर-गरीब शेतकऱ्यांचे कैवारी - राजेंद्र आमटे

शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने मोफत खते व बियाणे वाटप

बीड/प्रतिनिधी

एका शेतकऱ्यांचा मुलगा ते महाराष्ट्रातील विधिमंडळात सतत व सातत्यपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नवर आवाज उठवणारे झंझावाती नेतृत्व आ विनायकराव मेटे साहेब यांचा वाढदिवसा निमित्त शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने शेतकऱ्याना बियाणे व खते वाटप करण्यात आले.

        शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यासाठी पहिले अधिवेशनात आग्रही भूमिका घेऊन शेतकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहचणे, शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसानभरपाई, लाल्या रोगाची भरपाई ,शेतकरी पेंशन योजना या सारख्या अनेक प्रश्न साठी लढा देणाऱे आ विनायकराव मेटे यांचा वाढदिवस शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी खांडे पारगाव व नागापूर फाटा येथे घेण्यात आला या वेळी शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे व शेतकऱ्यांना शेतात पिकांना देण्यासाठी 19 19 19 मॅग्निशियाम खते यांची वाटप खांडे पारगाव सरपंच आसाराम आमटे, उपसरपंच विश्वभर सपकाळ, माजी सरपंच नागपूर जालिंदर साळुंके ,परमेश्वर साळुंके यांच्या हस्ते शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना वाटप करून आ विनायकराव मेटे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

      यावेळी शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे ,आसाराम आमटे (सरपंच खांडे पारगाव) सुभाष सपकाळ उपसरपंच, विश्वंभर सपकाळ उपसरपंच, परमेश्वर साळुंके नागपूर,राजू पटेल दहिफळ, पुरुषोत्तम साळुंके, शंकर साळुंके, बाळनाथ साळुंके, प्रकाश साळुंके,सिद्धेश्वर साळुंके, गोरख आमटे ग्रा.प सदस्य, जनार्धन अरगडे ग्रा.प.सदस्य, अरुण आमटे ग्रा .प सदस्य, कल्याण आमटे, दत्ता सुरवसे,भागवत आमटे,विठ्ठल आमटे,अभिमान आमटे,महारुद्र आमटे,अशोक आमटे रामप्रसाद आमटे यांच्या पंचक्रोशीतील शेतकरी उपलब्ध होते.

Sharing

Visitor Counter