कृषीदिना निमित्त शेतीनिष्ठ शेतकरी यांचा सत्कार विविध स्पर्धांचे विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण संपन्न कृषि संजीवनी सप्ताहाचा समारोप

Beed

कृषीदिना निमित्त शेतीनिष्ठ शेतकरी यांचा सत्कार विविध स्पर्धांचे विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण संपन्न कृषि संजीवनी सप्ताहाचा समारोप

बीड/वार्ताहर 

कृषी दिना निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात कृषि संजीवनी सप्ताहाचा समारोप, शेतीनिष्ठ शेतकरी यांचा सत्कार आणि जिल्ह्यात आयोजित विविध स्पर्धाचे विजेते विद्यार्थी यांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.  

आज झालेल्या या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी, विविध स्पर्धाचे पुरस्कार विजेते विद्यार्थी, कृषी विभागाच्या योजनांची माहिती सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारे कृषी अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड संगिता चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर , जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी विज्ञान केंद्रच्या श्रीमती पाटेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. 

जिल्हाधिकारी श्री शर्मा यावेळी म्हणाले, आज सत्कार करण्यात येत असलेले कृषी निष्ठ शेतकरी यांनी शेतीत प्रयोग करून जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचे नाव उंचावले आहे. व्यावसायिक शेती करताना ती किफायतशीर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकरी बांधवांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. 

राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड संगिता चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या एकल पत्नी व महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगितले त्या म्हणाल्या शेतीला जोडधंदा दिला तर शेतकऱ्याचा विकास होईल माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांचे शेती विकासातील योगदान मोठे होते त्यामुळे आपण आजचा त्यांचा जयंती दिन हा कृषी दिन म्हणून साजरा करतो.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रासायनिक खतांचा वापर आणि येणारे कमी उत्पन्न यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे बदलत्या सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे काळाची गरज आहे. त्यामुळे शेतीतील नवनविन प्रयोगांचे अनुकरण करून किफायतशीर शेतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. 

 यावेळी जिल्हाधिकारी श्री शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सोळंके, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड संगिता चव्हाण आणि विविध मान्यवर आदींच्या हस्ते शेतकरी, विद्यार्थी, कृषी अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार याप्रसंगी शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव, अभिमान अवचार , अण्णासाहेब जगताप, पंजाबराव हारे, प्रल्हाद गवारे आदी शेतकरी यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी गट कंपनीचे विकासासाठी चालना देण्यासाठीही प्रयत्नशील आहे माजी मुख्यमंत्री काय वसंतराव नाईक यांनी राज्यातील चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली व कृषी व शेतकऱ्यांच्या साठी मोठे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाच्या योजनांच्या प्रसारासाठी मोबाईल व्हॅनचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Sharing

Visitor Counter