डॉ. सतीश पावडे यांच्या "मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर" समीक्षा ग्रंथाला "इंदिरा-भालचंद्र" पुरस्कार

डॉ. सतीश पावडे यांच्या "मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर" समीक्षा ग्रंथाला "इंदिरा-भालचंद्र" पुरस्कार
नागपुर/सविता कुळकर्णी दि.०२.०७.२२
महाराष्ट्राचे ख्यातनाम नाटककार, नाट्य दिग्दर्शक, नाट्य समीक्षक तसेच नाट्यशिक्षक डाँ. सतीश पावडे यांच्या "मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर" या बहुचर्चित नाट्यसमीक्षा ग्रंथाची "इंदिरा-भालचंद्र" या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुणे नगर वाचन मंदिर, पुणे ही महाराष्ट्रातील १७५ वर्षे जुनी संस्था आहे. लोकहितवादी यांनी १८४८ साली या संस्थेची स्थापना कली आहे. अशा या ऐतिहासिक महत्व असलेल्या संस्थेने ख्यातनाम भारतीय नाट्यसमीक्षक आणि मराठी रंगभूमी कोषाचे संपादक स्मृतिशेष डाँ. वि.भा. देशपांडे पुरस्कृत (त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृति प्रीत्यर्थ असलेल्या) "इंदिरा-भालचंद्र" या पुरस्कारासाठी उपरोक्त ग्रंथाची निवड केली आहे. ही माहिती पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यवाह सुवर्णा जोगळेकर यांनी दिली आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा दि. ७ आँगस्ट रोजी पुण्यात होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नाटक सेन्साँर बोर्डाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध नाट्य निर्माते श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते हा पुरस्कार डाँ. पावडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर" या बहुचर्चित नाट्यसमीक्षा ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथील नेक्स्ट पब्लिकेशनने केले आहे. मुखपृष्ठ जागतिक ख्यातीचे चित्रकार विजयराजे बोधनकर यांचे आहे तर प्रस्तावना राजीव जोशी आणि ब्लर्ब संजय सोनवणी यांचा आहे. या ग्रथांला या पुर्वीही जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा महात्मा ज्योतिबा फुले साहित्य पुरस्कार लाभला आहे. डॉ. सतीश पावडे हे वर्धा येथील महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्रादर्षिक कला विभागात सहायक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आता पर्यंत नाटक, चरित्र, भाषांतरीत, रूपांतरीत, संपादित अशी २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी भारत सरकारच्या संशोधन शोधवृत्तीचेही ते मानकरी आहेत. नुकताच त्यांची खैरागढ़ येथील इंदिरा कला संगीत विद्यापीठात 'नाटक-नाट्यकला आणि नाट्यशास्त्र' या विषयावर डि.लिट. करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.मराठी विश्वकोषाच्या नाटक ज्ञान मंडळाचे सल्लागार आणि मराठी नाट्य सेन्सार बोर्डावरही त्यांनी अनेक वर्ष कार्य केलेले आहे.








