आ.संदीभैय्यांच्या सूचनेनुसार स्वच्छता मोहीम

आ.संदीभैय्यांच्या सूचनेनुसार स्वच्छता मोहीम
नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून बाजारतळावरील घाण हटवण्यास सुरूवात
बीड/प्रतिनिधी
नागरीकांची मागणी व गरज लक्षात घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील बाजार तळावर आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार येथील परिसर स्वच्छ करून नगरपरिषदेने बांधलेल्या ओट्यांवरच बाजार भरविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.या स्वच्छता मोहीमेची सुरूवात शनिवार (दि.२) रोजी करण्यात आली असून पुढील बाजार याठिकाणीच भरविण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील बाजारतळावर भाजीपाला विक्रीसाठी नगर परिषदेकडून ओटे बांधण्यात आले आहेत.परंतु या परिसरात भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी न बसता रस्त्यावर बसतात.यामुळे वाहतुकीस प्रचंड अडचण निर्माण होते.त्यामुळे येथील नागरीकांकडून करण्यात आलेली मागणी व वाहतूकीला होणारा त्रास लक्षात घेत शनिवार (दि.२) रोजी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सुचना केली.यावर तात्काळ कार्यवाही करत नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी,मजुरांसह बाजार तळावर पोहोचले व स्वच्छता मोहीमेला सुरूवात केली.जेसीबी,ट्रॅक्टर व मजुरांच्या सहाय्याने येथील स्वच्छता कार्य सुरू असून यापुढील बाजार येथेच भरविण्यासाठी विक्रेत्यांना सुचना करण्यात आल्याचे नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या माध्यमातून शहरातील महत्त्वाचा प्रश्न आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकाराने मार्गी लागणार आहे.








