गेवराईत बॅंक खातेदारांची फसवणुक चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

Beed

गेवराईत बॅंक खातेदारांची फसवणुक चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

बीड/प्रतिनिधी

बँक खातेदारांसह कर्जदारांकडून पॉलिसीच्या हप्त्यापोटी पैसे भरून घेवुन ते परत न देता फसवणुक केल्याचा प्रकार गेवराईत उघडकीस आला आहे . याप्रकरणी गेवराईच्या पुर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या मॅनेजरसह तिघांविरूद्ध गेवराई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे . गेवराई येथील व्यवसायीक पांडुरंग नाना कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , आयसीआयसी लोंबार्ड जनरल इंशुरन्स कंपनीने व पुर्णवादी नागरी सहकारी बँक शाखा मॅनेजर यांनी माझ्यासह इतर खातेदार व कर्जदारांच्या पॉलिसीच्या हप्त्यापोटी पैसे भरून घेतले . मात्र पॉलीसीचे पैसे परत न देता दि . २४ जुन २०२० ते दि . १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत फसवणुक केली . याप्रकरणी कोल्हे यांच्या फिर्यादीवरून मार्तंड रेणापुरकर पुर्णवादी बँक शाखा गेवराई यांच्यासह भुसे , कवठेकर , आयसीआयसी लोंबार्ड जनरल इंशुरन्स कंपनी यांच्याविरूद्ध कंपनीतील मॅनेजर पुर्णवादी बँक शाखा गेवराई यांच्याविरूद्ध कलम ४२० , ४०६ , ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो . नि.साबळे करीत आहेत .

Sharing

Visitor Counter