शिवाजीनगर डिबी पथकाची धडाकेबाज कारवाई;मोबाईल चोरास केले जेरबंद 

Beed

शिवाजीनगर डिबी पथकाची धडाकेबाज कारवाई;मोबाईल चोरास केले जेरबंद 

बीड/वार्ताहर 

काल दिनांक 01/07/2022 रोजी सायंकाळी 04.00 वाजताचे सुमारास बस स्थानक पाटीमागील डीपी रोडला लागुन असलेला ड्रीम फिटनेस चे जवळ असलेल्या कुलथे यांच्या वाड्यात विदर्भातील अमरावती , वाशिम , चंद्रपुर येथुन एमबीए फायनल वर्षाचा पेपर देण्यासाठी काही विद्यार्थी आलेले असतांना व ते मित्राच्या रुमवर थांबुन असतांना एक अनोळखी ईसम हा वाड्यात येवुन घरात शिरुन मोबाईल चोरुन घेवुन गेल्याने फिर्यादी नामे श्रीकांत शेषराव वाघ , वय 30 वर्ष , व्यवसाय शिक्षण , रा . गोवर्धन ता . रिसोड , जिल्हा वाशिम मो . नं . 95610440047 यांचे तक्रारीवरुन गुरन 270/2022 कलम 380 भादवि असा दाखल होवुन ठाणे प्रभारी मा . पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी तात्काळ डी . बी . पथकाचे प्रमुख पोउपनि पाथरकर यांना सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का त्याचे अवलोकन करुन तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेशीत केल्यावरुन डी.बी. पथकाचे पोउपनि पाथरकर , सोबत पोह फिरोज पठाण , राहुल पाईकराव , सुदर्शन सारणीकर , संजय राठोड , विष्णु चव्हाण यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासुन सदर गुन्हा हा शेख माजेद शेख गफुर राहणार गोरेवस्ती , बांगर नाला , बीड याने केल्याचे उघड केले व गुप्त बातमीदाराकडुन त्याची माहीती काढली असता तो सध्या सम्राट चौकात असल्याचे समजल्यावरुन डी . बी पथकाने सापळा लावुन त्यास पकडुन ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सुरवातीला उडवीउडवीची उत्तरे दिली असता त्यास अधिक विश्वासात विचारता त्याने सदरचा गुन्हा हा दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने केला असल्याचे सांगीतले आहे . त्यावरुन त्यास सदर गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेवून अटक करुन आज रोजी त्यास मा . न्यायालयात हजर केले असता मा . न्यायलयाने त्यास दिनांक 05/07/202 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यावरुन सदर गुन्ह्यातील चोरुन नेलेला oppo reno 5 कंपनीचा मोबाईल किंमत 35,990 / - किमतीचा चोरी केलेला गुन्ह्यातील माल जप्त करण्यात आला आहे . सदर आरोपी हा सराईत चोर असुन याने पोस्ट शिवाजी नगर व्यतिरीक्त बीड शहर , पेठ बीड , बीड ग्रामिण भागात सुद्धा अश्याच प्रकारचे गुन्हे केल्याचे अभिलेखावरुन समजते तरी आरोपीने अलिकडच्या काळात अधिक गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक श्री . नंदकुमार ठाकुर , अप्पर पोलीस अधीक्षक श्री . सुनिल लांजेवार , उपविभागीय पोलीस अधीकारी श्री . संतोष वाळके, शिवाजी नगर पोटेचे पो.नि. केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डी . बी . पथरक प्रमुख पो.उप.नि प्रविण पाथरकर , सोबत फिरोज पठाण , राहुल पाईकराव , सुदर्शन सारणीकर ,संजय राठोड ,विष्णु चव्हाण सर्व नेमणुक सर्व गुन्हे शोध पथक , पोस्टे शिवाजी नगर , बीड यांनी केली आहे . याबाबत अधिक तप्पास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत .

Sharing

Visitor Counter