शेतकऱ्यांची अत्महत्यात वाढ ;आज जिल्ह्यात दोन आत्महत्या 

Beed

शेतकऱ्यांची अत्महत्यात वाढ ;आज जिल्ह्यात दोन आत्महत्या 

बीड/प्रतिनिधी

शेतकऱ्यांकडून पाऊसला घेऊन खुप विचार चालु असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत त्यात कुठे पाऊस आहे तर कुठे पाऊस नाही तर आणी पेरणी जवळपास पूर्ण होत आली त्यातच अता शेतकऱ्यांकडून पावसाची वाट बघीतली जात आहे परंतु वेळेवर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर डोंगर कोसळल्या सारखे आहे या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांना आपले जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत . गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण शिवार मारफळा येथे आज पहाटे भिमराव देवराव कुटे ( ५२ ) यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली . याप्रकरणी दत्तात्रय देवराव कुटे यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस शिपाई गायकवाड हे करीत आहेत . गेवराई तालुक्यातील रांजणी येथील अंकुश अच्युतराव सावंत ( ५० ) यांनी दि . २ जुलै रोजी स्वतःच्या शेतात रोगर हे किटकनाशक औषध प्राशन केले होते . त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र काल रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला . अंकुश सावंत यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र समजु शकले नाही .

Sharing

Visitor Counter