शहरातील पान टपरी मध्ये चोरी
Beed

शहरातील पान टपरी मध्ये चोरी
बीड/प्रतिनिधी
अज्ञात चोरट्यांनी छावा पान सेंटरमध्ये घुसुन दुकानातील रोखरक्कम व विविध कंपन्यांच्या सिगारेटचे पाकिट असा एकुण १९ हजार ४९५ रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना अंबाजोगाईत घडली . अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौकात गणेश संभाअप्पा बरदाळे यांचे छावा पान सेंटर नावाचे दुकान आहे . अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये घुसुन रोख रक्कम व विविध नामांकित कंपन्यांच्या सिगारेट असा एकुण १९ हजार ४९५ रूपयांचा ऐवज लंपास केला . याप्रकरणी बरदाळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .








