धारूर येथील वर्ग दोन मधील इनामी जमिनीची वर्ग एक मध्ये नोंद करून बेकायदेशीर खरेदी विक्री

Beed

धारूर येथील वर्ग दोन मधील इनामी जमिनीची वर्ग एक मध्ये नोंद करून बेकायदेशीर खरेदी विक्री

दोशी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करा अन्यथा बेमुदत उपोषण करून - सय्यद सलीम बापू

बीड/प्रतिनिधी

मौजे धारुर येथील स.नं .६२४ अ व ६२४ आ ही इनामी जमीन वर्ग - २ मधील असतांना धारुर तहसीलच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने वर्ग - १ मध्ये नोंदवून बेकायदेशीर रित्या खरेदी - विक्री व फेरफार करण्यात आलेले आहे.या संबंधी तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दि .१२ / ०७ / २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन लोकतंत्रिक जनता दलचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
     असे की मौजे धारुर येथील स.नं .६२४ अ व ६२४ आ ही इनामी जमीन वर्ग - २ मधील असतांना वर्ग - १ मध्ये सातबारावर नोंद घेवून बेकायदेशीर रित्या खरेदी - विक्री व फेरफार केलेली आहे व फेर क्रं . १०६५ दि .१३ / १० / १ ९ ६३ हे फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावे व जायमोक्यावर जावून संबंधीत जमीनीचे पंचनामे करुन ही जमीन वर्ग - २ मध्ये समाविष्ठ करण्यात यावी . 
      धारुर येथील तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मेहरबानीने अशा अनेक देवस्थानाच्या इनामी जमीनीची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे यावर सुध्दा चौकशी करण्यात यावी.व संबंधीत इनामी जमीनी विषयी तात्काळ कार्यवाही करण्यात याव.तसेच नगर परिषद किल्लेधारुर,रजिस्ट्री ऑफीस,भूमिअभिलेख कार्यालय,मंडळ अधिकारी व तलाठी या कार्यालयाची चौकशी करुन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व झालेली रजिस्ट्री रद्द करण्यात यावी,अन्यथा दि .१२ / ०७ / २०२२ रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.अशा आशयाचे निवेदन लोकतांत्रिक जनता दलाचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले  यावेळी शेख इलियास,इजाज इनामदार,सय्यद अल्ताफ सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter