जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा 14 ते 16 जुलै दरम्यान

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा 14 ते 16 जुलै दरम्यान
बीड/वार्ताहर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशान्वये सन 2022-23 या वर्षातील 61 वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल (सब ज्युनियर/ज्युनियर) क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यान्वये आपल्या जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 14 ते 16 जुलै 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे : वयोगट 14 वर्षाखालील मुले (सबज्युनियर) - दि. 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा, 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) - दि. 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा.
जे संघ सदरील जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशा सर्व संघांनी/ खेळाडुंनी जिल्हास्तरीय स्पर्धेच्या तीन दिवस आधी www.subrotocup.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्या शिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तसेच अर्जासोबत संकेतस्थळावर भरलेल्या अर्जाची प्रत कार्यालयात सादर करावी.
सहभागी होणाऱ्या संघाकडे/ खेळाडूकडे जन्म दाखला/ अधार कार्ड, पासपोर्ट व वयाबाबत वैद्यकीय दाखला आवश्यक आहे. तसेच एखादा खेळाडू अधिक वयाचा नमुद सुचने नुसार प्रवेश अर्ज दि. 11 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे सादर करावेत व त्याची पोच घ्यावी. घेतलेली पोच स्पर्धेच्या वेळी सोबत ठेवावी. जेणेकरुन सदरील स्पर्धा यशस्वी पार पाडल्या जातील. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त फुटबॉल संघाने जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड यांनी केले आहे.








