निंबोळी अर्कचा किटकनाशकाचा वापर करण्याचे आवाहन

Beed

निंबोळी अर्कचा किटकनाशकाचा वापर करण्याचे आवाहन

बीड/वार्ताहर 

जिल्ह्यात बऱ्याच भागात जून चे मध्यास पेरण्या झालेल्या आहेत. अशी पिके 2-3 आठवड्यांची झालेली आहेत. अशा पिक वाढीच्या अवस्थेत बरेचदा शेतकरी किड नियंत्रणासाठी पिक नुकसानीची पातळी ओलांडलेली नसताना किटकनाशकाचा वापर करतात. त्यामुळे खर्चात वाढ होण्याबरोबर पर्यावरणास देखील हानी पोहोचते. तेव्हा अशा अवस्थेत निंबोळी अर्काचे 5 टक्के द्रावणाची फवारणी हा पर्यावरणास देखील प्रतिबंधात्मक पर्याय ठरु शकतो. त्यासाठी या हंगामात गोळा केलेल्या निंबोळीची पावडर करुन 5 किलो निंबोळी पावडर 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावी. तसेच 200 ग्रॅम साबण चुरा वेगळ्या पात्रात 1 लिटर पाण्यात भिजत घालावा. सकाळी निंबोळीचे मिश्रण काठीने चांगणे ढवळून अर्क दोन पदरी सुती कापडाने गाळून घ्यावा. या 9 लिटर पाण्यात 1 लिटर साबण चुऱ्याचे पेस्ट स्वरुप मिश्रण टाकूण ढवळून घ्यावे. अशा रितीने 10 लिटर निंबोळी अर्ज मिळतो. तो 90 लिटर पाण्यात मिसळून त्याच दिवशी पिकांवर फवारणी करावी.

 

            निंबोळी अर्काच्या प्रतिबंधात्मक फवारणी मुळे किटक निंबोळीचे वासाने फवारणी केलेल्या क्षेत्रावर येण्याचे, त्यावर अंडी घालण्याचे घातलेली अंडी उबण्याचे प्रमाण कमी होते. लहान अवस्थेतील अळ्या फवारणी केलेला भाग खाण्याचे प्रमाण कमी होते. अंडी अळी कोष प्रौढ अथवा अळी प्रौढ हे चक्र निंबोळी अर्काचे फवारणीमुळे सुलभ रित्या चालत नाही, पर्यायी किडींचे नियंत्रण करण्यात प्राथमिक अवस्थेत निंबोळी अर्क अत्यंत उपयुक्त आहे. तरी अर्थिक नुकसान पातळी ओलांडने खेरीज थेट रासायनिक किटकनाशकाची फवारणी करु नये, त्या ऐवजी गरह असेल तर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्याक्षिकासाठी आपले स्थानिक क्षेत्राचे कृषी सहाय्यक यांना संपर्क साधण्यात यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter