स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही जबरी चोरी व घरफोडी गुन्हे करणारे आरोपी जेरबंद 

Beed

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही जबरी चोरी व घरफोडी गुन्हे करणारे आरोपी जेरबंद 

चकलंबा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद

बीड/वार्ताहर 

दिनांक 04/06/2022 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याचे सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र .61 चे रोडवर मातोरी शिवारात फिर्यादी सदाशिव विठोबा कोल्हाटे , वय 45 वर्षे , व्य . ड्रायव्हर , रा . कोळवाडी ता . शिरुर हे त्यांचे कडील टाटा आयशर कंपनीचे गाडीमध्ये लोखंडी सळया घेवून राष्ट्रीय महामार्ग क्र .61 चे रोडवरुन मातोरी ते मिडसिंगी मार्गे शिरुरकडे जात असतांना मातोरी येथील चढावर मंदिरासमोर आले असता अनोळखी चार इसमांनी फिर्यादीचे वाहनास मोटार सायकल आडवी लावून गाडी थांबवून मारहाण करून नगदी रक्कम व एक मोबाईल जबरीने चोरून घेवून गेले होते . त्यावरुन पो.नि.स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक गेवराई , चकलंबा भागात आरोपीचा शोध घेत असतांना , त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा रविंद्र पोपट घुले याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला आहे व तो सध्या पाडळसिंगी येथून खरवंडीकडे जात आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून मादळमोही येथे सापळा लावून त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रविंद्र पोपट घुले वय 23 वर्षे , रा.काटेवाडी , ता . पाथर्डी , जि.अ.नगर असे सांगितले त्यास गुन्हयाबाबत विचारले असता त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचे इतर तीन साथीदारांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे . रविंद्र पोपट घुले वय 23 वर्षे , रा.काटेवाडी , ता.पाथर्डी , जि.अ.नगर यास पो.स्टे . चकलंबा गुरनं 84/2022 कलम 392 भादंविचे गुन्हयाचे तपासकामी पो.स्टे . चकलंबा येथे हजर केले आहे . गुन्हयातील चोरलेल्या मुद्येमालाबाबत व इतर साथीदारांबाबत पो.स्टे . चकलंबा व स्था.गु.शा. चे पथक पुढील तपास करीत आहेत . त्यांचेकडून आणखिन गुन्हे उघड येण्याची शक्यता असल्याने त्या संदर्भाने तपास चालू आहे .

पाटोदा येथील जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद:-दिनांक 26/06/2022 रोजी दिड वाजण्याचे सुमारास महानंदा परमेश्वर हुलजुते , वय 55 वर्षे , रा . कुसळंब ता . पाटोदा यांचे राहते घरी कुसळंब येथे बेडरुमचे दार उघडे ठेवून झोपलेली असतांना अज्ञात चार इसमांनी आत प्रवेश करून कपाट उचकत असतांना फिर्यादी उठल्याने फिर्यादीचे तोंडावर चाकु मारून जखमी करून सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून घेवून गेले होते . त्यावरुन पो . नि . स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक आष्टी , पाटोदा भागात आरोपीचा शोध घेत असतांना , त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा ढेबय रामु चव्हाण याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला आहे व तो सध्या वारंगुळे वस्ती , आष्टी येथे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून वारंगुळे वस्ती , आष्टी येथे सापळा लावून त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ढेबय रामु चव्हाण , वय 45 वर्षे , रा . पांडेगव्हाण , ता . आष्टी , जि.बीड असे सांगितले त्यास गुन्हयाबाबत विचारले असता त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचे इतर तीन साथीदारांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे . ढेबऱ्या रामु चव्हाण , वय 45 वर्षे , रा . पांडेगव्हाण , ता . आष्टी , जि . बीड यास पो.स्टे . पाटोदा गुरनं 117/2022 कलम 394 भादंविचे गुन्हयाचे तपासकामी पो.स्टे . पाटोदा येथे हजर केले आहे . गुन्हयातील चोरलेल्या मुद्येमालाबाबत व इतर साथीदाराबाबत पो.स्टे . पाटोदा व स्था.गु.शा. चे पथक पुढील तपास करीत आहेत . त्यांचेकडून आणखिन गुन्हे उघड येण्याची शक्यता असल्याने त्या संदर्भाने तपास चालू आहे . 

पेठ बीड येथील घरफोडी करणारे आरोपी जेरबंद:-दिनांक 04/07/2022 रोजी रात्री एक वाजता फिर्यादी भगिरथ मोहनलाल चरखा वय 59 वर्षे व्य . व्यापार , रा.शनिमंदिर गल्ली बीड हे त्यांचे राहते घरी नेहमीप्रमाणे कुटूंबासह जेवण करून आपआपले खोलीत जोवून झोपले व राहिलेल्या दोन रुमचा दरवाजा ओढुन घेतलेला होता . सकाळी 0730 वा . फिर्यादीची पत्नी सुनिता यांना झाडलोट करत असतांना ओढुन घेतलेल्या दोन रुमचा दरवाजा उघडा दिसला तेव्हा रुममध्ये जावून पाहिले असता कपाट उघडे दिसले . कपाटातील सामान अस्थाव्यस्त पडलेले दिसले व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी असे चोरुन नेले होते . त्यावरुन पो.नि.स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक बीड शहर व परिसरात आरोपीचा शोध घेत असतांना , त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा शेख कलिम शेख अलिम याने केला आहे व तो सध्या गेवराई बायपास येथे येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून नमुद ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख कलिम उर्फ कल्लु शेख अलिम , वय 28 वर्षे , रा . दहिफळ पोस्ट नाळवंडी ता.जि. बीड ह.मु. अन्सार कॉलनी पडेगाव , औरंगाबाद असे सांगितले . त्यास गुन्हयाबाबत विचारले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . शेख कलिम शेख अलिम यास पो.स्टे . पेठ बीड गुरनं 138/2022 कलम 457,380 भादंवि गुन्हयाचे तपासकामी पो.स्टे . पेठ बीड येथे हजर केले आहे . गुन्हयातील चोरलेल्या मुद्येमालाबाबत पो.स्टे . पेठ बीड व स्था.गु.शा.चे पथक पुढील तपास करीत आहेत . त्यांचेकडून आणखिन गुन्हे उघड येण्याची शक्यता असल्याने त्या संदर्भाने तपास चालू आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , बीड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे .

Sharing

Visitor Counter