आषाढी एकादशी, बकरी ईद हे. सण शांततेत साजरे करा पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांचे आवाहन
Beed

आषाढी एकादशी, बकरी ईद हे. सण शांततेत साजरे करा पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांचे आवाहन
माजलगाव/प्रतिनिधी
माजलगाव शहर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरिक्षक यांनी बैठकचे आयोजन करून सकल समाज बांधवांना सांगितलेकी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन सण एकाच दिवशी येत्या रविवारी दि. 10 जुलै रोजी साजरे होत आहेत. दोन्ही सण सौहार्दपूर्ण वातावरणात व शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करून कायद्याचे कोठेही उल्लंघन होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, असे आदेश तहसीलदार मनिषा मनाळे, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे , न.प.मु. विशाल भोसले यांनी बैठकित दिले . यावेळी मुस्लिम समाज व विविध पक्ष संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते








