पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर विष्णू महाराज पारनेरकर

Beed

पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर विष्णू महाराज पारनेरकर

 १७ जुलै रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश दौऱ्यावर

 बीड/प्रतिनिधी

पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर डॉ.विष्णू महाराज पारनेरकर हे येत्या रविवार १७ जुलै २०२२ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या पवित्र उपस्थीतीत येथील श्री. गणपती देवस्थान लिंबागणेश ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांचा सहस्त्र चंदर्शन सोहळा होणार असुन संगित मैफीलीचे आयोजन करण्यात आले आहे.

लिंबागणेश येथील श्री. गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन येत्या रविवार १७ जुलै २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळेत गावातील भालचंद्र गणपती मंदिराजवळील सभागृहात करण्यात आले आहे. सोहळ्यास पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर डॉ.श्री.विष्णू महाराज पारनेरकर, व पारनेकर गुरूसेवा मंडळाचे अध्यक्ष गुणेशदादा पारनेरकर हे उपस्थीत राहणार आहेत. याच दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत अंधेरी येथील गायिका पंडित अंकिता जोशी यांची संगित मैफील रंगणार आहे. या वेळी पूर्णवाद वर्धिष्णू डॉ.विष्णू महाराज पारनेरकर यांची उपस्थीती असणार आहे. कार्यक्रमास उपस्थीत रहावे असे आवाहन चिंतामण जोशी, पंढरीनाथ कोरान्ने, हेमंत जोशी, गणेश जोशी,मंगेश जोशी, मंदिराचे पुजारी श्रीकांत जोशी यांनी केले आहे. दरम्यान गणपती मंदिरात रविवार दुपारी २ ते ५ या वेळेत गणेशभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

पत्रकार दिनेश लिंबेकर लिखीत मोरया गणेश ग्रंथाचे प्रकाशन

दिव्य मराठीचे पत्रकार दिनेश लिंबेकर यांनी बीड जिल्ह्यातील २१ गणपतीच्या स्थान महात्म्यावर लिहिलेल्या मोरया या गणेश ग्रंथाचे प्रकाशन पूर्णवाद वर्धिष्णू डॉ.विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते रविवार १७ जुलै २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लिंबागणेश येथे होणार आहे.

Sharing

Visitor Counter