हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम आयआयएचटी बरगढ, वेंकटगिरी येथे प्रवेशासाठी

Beed

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम आयआयएचटी बरगढ, वेंकटगिरी येथे प्रवेशासाठी

अर्ज पाठविण्यास ११ जुलैपर्यंत मुदतवाढ

   मुंबई/वार्ताहर 

 हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था बरगढ आणि वेंकटगिरी येथे शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी अनुक्रमे १४ आणि २ जागांवर महाराष्ट्र राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांना केंद्र शासनाने अर्ज पाठविण्यास ११ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

  तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्था बरगढ (ओडिशा) येथे १४ आणि वेंकटगिरी येथे २ जागांवर महाराष्ट्र राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी इच्छूक उमेदवारांना नागपूर, सोलापूर, मुंबई आणि औरंगाबाद येथील वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांमार्फत विहित नमुन्यातील अर्ज आता ११ जुलै २०२२ पर्यंत पाठवता येतील. प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या http://www.dirtexmah.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असेही आयुक्त श्रीमती तेली-उगले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Sharing

Visitor Counter