आदिवासी समीकरण वसतिगृह येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

Beed

आदिवासी समीकरण वसतिगृह येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

बीड/प्रतिनिधी

रोटरी क्लब बीड सिटी ही शहरातील नामांकित संघटना असून सामजिक कार्यात सतत अग्रेसर असते. सामाजिक, शैक्षणिक, महिला सबलीकरण या क्षेत्रात रोटरी क्लब बीड सिटी ने भरीव कामगिरी केली आहे.

आरोग्य क्षेत्रात देखील रोटरी क्लब बीड सिटी चे कार्य उल्लेखनीय आहे. रोटरी क्लब बीड सिटी द्वारे घेण्यात आलेल्या मुक्ताबाई पालखीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, मोफत नेत्ररोग तपासणी, काच बिंदू - मोती बिंदू तपासणी व उपचार, त्वचा रोग तपासणी व औषोधोपचार, दंतरोग तपासणी व उपचार, कॅन्सर रोग तपासणी व उपचार इत्यादी शिबिरांची दखल शासनस्तरावर घेण्यात आली आहे.

              सामाजिक जबाबदारी व आदिवासी समिकरण वसतिगृहातील आवश्यकता विचारात घेऊन रोटरी क्लब बीड सिटी ने वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले.सदरील तपासणी शिबिरास तज्ञ डॉक्टरचा चमू उपस्थीत होता. डॉ. सुहास देशपांडे, डॉ. डी. एस. साळुंके, डॉ. किरण कोळेकर यांनी तपासणी सह विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.

              शिबिर यशस्वी करण्याकरीता अध्यक्ष रो. विष्णुदास तापडिया, सचिव रो. दिपक कर्णावट, प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉ. किरण कोळेकर, रो. संतोष जोशी, रो. सचिन लातूरकर, रो. सुजित सुर्यवंशी, रो. मंगेश नागने, रो. अक्षय मुळे, रो. दिपक कुलकर्णी, रो. प्रविण पटेल आदींनी परिश्रम घेतले.

Sharing

Visitor Counter