पोलीस निरीक्षक रवी सानप यांची धडाकेबाज कारवाई अवघ्या १२ तासता चोरट्याच्या अवळल्या मुसक्या

पोलीस निरीक्षक रवी सानप यांची धडाकेबाज कारवाई अवघ्या १२ तासता चोरट्याच्या अवळल्या मुसक्या
बीड/प्रतिनिधी
शहरातील पाटांगणकर महाराज संस्थानातील श्री जनीजनार्धन स्वामी यांच्या ४०० वर्ष जुन्या पादुका अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना काल दुपारी ३ ते ५ या वेळेत घडली होती . शहर ठाण्याचे पो . नि . रवि सानप आणि त्यांच्या टिमने अवघ्या १२ - तासात या प्रकरणाचा छडा लावत चोरट्याला गजाआड केले . बीड शहरातील बलभिम चौक भागातील पाटांगणकर महाराज संस्थानातील श्री जनीजनार्धन स्वामी यांच्या दोन पादुका चोरी गेल्याची घटना काल दुपारी घडली होती . शहर ठाण्याचे पो.नि. रवि सानप यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला . तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ५०० मिटर अंतरावर एक संशयीत आढळुन आला . पोलीसांनी त्या संशयीताची माहिती घेण्यास सुरूवात केली आणि आज दुपारी रोहन पवन गायकवाड ( रा.थिगळे गल्ली , बीड ) याला ताब्यात घेतले . प्राथमिक चौकशी आणि त्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत पादुका घरी असल्याचे सांगितले . पोलीसांनी घरी जावुन त्या पादुका ताब्यात घेतल्या आहेत . सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर , अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार , डीवायएसपी संतोष वाळके , यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवि सानप , एपीआय घनश्याम अंतरभ , डीबी पथकातील बाळासाहेब सिरसाट , मनोज परजने , सय्यद अशपाक , अविनाश सानप यांनी केली . अवघ्या १२ तासामध्ये पो.नि. सानप आणि त्यांच्या टिमने पादुका चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत तत्परता दाखवुन दिली आहे .








