जिव्हाळा बेघर निवारा केंद्रास नगरपरिषद मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची सदिच्छा भेट

जिव्हाळा बेघर निवारा केंद्रास नगरपरिषद मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची सदिच्छा भेट
बीड/प्रतिनिधी
बीड येथील भाजी मंडई परिसरातील बेघर निवारा केंद्र बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ढाकणे यांनी शुक्रवार दि ८ जुलै रोजी सदिच्छा भेट देऊन येथील कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बेघर निवारा केंद्रातील सर्व व्यवस्थेची पाहणी केली तसेच लाभार्थ्यांची मनमोकळी चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला. नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची यावेळी त्यांनी आश्वासन दिले विशेष करून उमेश ढाकणे यांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्र येथील स्वच्छतेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच लाभार्थ्यांनी तयार केलेली भाजीपाल्याची शेतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
तर याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उमेश ढाकणे म्हणाले की, जिव्हाळा बेघर निवारा केंद्र यांचे कार्य उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगे आहे. कोरोना काळामध्ये मानवी आरोग्य धोक्यात असताना जीवाला बेगर निवारागृहातील व्यवस्थापकांनी अनाथ अपंग बेगर लाभार्थ्यांची मनोभावे सेवा केली तसेच आजही येथील व्यवस्था नियोजन उत्तम असून सर्वच लोक अगदी गुण्या गोविंदाने राहतात असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.
याप्रसंगी जिव्हाळा बेघर निवारा वस्तीगृहाचे व्यवस्थापक राजू वंजारे म्हणाले की, जिव्हाळा बेघर निवारा गृह हे आमच्यासाठी एक परिवार असून परिवारातील सर्व सदस्य आपले सर्व दुःख बाजूला काढून येथील छोट्या मोठ्या कार्यक्रमात आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आमचे समाधान असून पुढील काळातही आम्ही रंजल्या गांजल्या च्या सेवे साठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शहर अभियान व्यवस्थापक अमोल बडगुजर, समुदाय संघटक संतोष थिटे, समुदाय संघटक दीपक खळगे, समुदाय संघटक स्वाती वाणी, समुदाय संघटक जयश्री ढाके यांच्यासह बेघर निवारा गृहातील संचालक अभिजीत वैद्य, शालिनी परदेसी, यश वंजारे, कल्याण गोरे यांच्यासह महिला पुरुष लाभार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी उमेश ढाकणे यांचा जिव्हाळा बेघर निवारागृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.








