देव दिसे ठाई ठाई,भक्तलीन भक्तापाई..सुखालाही आला या, हो आनंदाचा पूर,चालला नामाचा गजर,अवघे गरजे पंढरपूर!

देव दिसे ठाई ठाई,भक्तलीन भक्तापाई..सुखालाही आला या, हो आनंदाचा पूर,चालला नामाचा गजर,अवघे गरजे पंढरपूर!
बीड/वार्ताहर
आज दिनांक ९/७/२०२२,शनिवार, रोजी बीड येथील ट्विंकलींग स्टार शाहूनगर येथे आषाढी एकादशी चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय एडवोकेट प्रज्ञाताई खोसरे( बाल हक्क संरक्षण आयोग सदस्या), महाराष्ट्र राज्य. यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संगीत विशारद गया ताई तुरुक मारे, जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान ,(शिरस मार्ग ,संचालिका )याही प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या. तसेच शाळेचे डायरेक्टर असलेले गणेश मेढ सर तसेच भास्करन सर, यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे इन्चार्ज असणाऱ्या राखी सचदेव मॅडम यांनी केले, तर सूत्रसंचालन गंदे मॅडम यांनी केले, तसेच प्रियंका लाड, मनीषा, प्रियंका ओझा, स्नेहल मॅडम, सरिता मॅडम यांनीही भजन गीत सादर केले. तसेच शाळेचे विद्यार्थ्यांनीही मिलिंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादर केले व सगळ्यात शेवटी कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने पुनम वाघमारे यांनी केली.








