संस्कार भारती बीडचा अभिनव उपक्रम

संस्कार भारती बीडचा अभिनव उपक्रम
गुरुपौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला गौरव
बीड/प्रतिनिधी
संस्कार भारती बीड च्या वतीने बुधवारी गुरुपौर्णिमे निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निवासस्थानी भेट देवुन सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
संस्कार भारती बीडच्या वतीने प्रत्येक वर्षी नटराज पूजन व गुरुपूजन केले जाते. यंदा सुदर्शन धुतेकर (संगीत) बापू घोक्षे (नाट्य) प्रा.जे पी शेळके (क्रीडा) संपादक दिलीप खिस्ती (पत्रकारिता) वाय.जनार्दनराव (उद्योग) अँड.एल.वाय.पालसिंगनकर (विधि)डॉ. सी. ए. गायकवाड (वैद्यकीय) डॉ.अरुण भस्मे (शिक्षण) या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांच्या निवास्थानी जावुन गौरव करण्यात आला. आपण केलेल्या कार्याची कोणीतरी दखल घेऊन गौरव करीत आहे. हेच खुप आनंददायी व मनाला सुखावणारे आहे. या सत्काराने जगण्याची नवी उर्जा मिळते व कार्य करण्याची प्रेरणा अधिक वृध्दींगत होते अशी भावना बुधवारी मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमात सुरेश साळुंके यांनी गौरव पत्राचे वाचन केले.या प्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांताध्यक्ष भरत लोळगे,जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे, वासुदेव निलंगेकर,गणेश तालखेडकर ,लक्ष्मीकांत सौंदत्तीकर,संतोष पारगावकर,अनिल कुलकर्णी,प्रा.राहुल पांडव,अशोक कुलकर्णी,महेश देशमुख,अशोक घवाने,गुरु कुलकर्णी आदी उपस्थित होते.








